सोलापूरचे ग्रामदैवत असलेले हे मंदिर तळ्याच्या मध्यभागी वसलेले आहे. योगी श्री सिद्धेश्वर स्वामी हे शंकराचा अवतार समजले जात. त्यांनी बाराव्या शतकामध्ये याचजागी संजीवन समाधी घेतली आहे. या मंदिर परिसरात गणपती आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देखील आहेत. तसेच चांदिने मढवलेला नंदी देखील या परिसरात पहायला मिळतो. या मंदिरात मकर संक्रांतिचा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तसेच येथील गाडा यात्रादेखील अतिशय प्रसिद्ध आहे