सोलापूर
पर्यटन

सिद्धेश्वर वनविहार

गावाचे नाव : सोलापूर
तालुका : सोलापूर

वनपर्यटन योजनेखाली सोलापूर वनविभागाने १९९७ साली सिद्धेश्वर वनविहाराची निर्मिती केली. २१० हेक्टर राखीव वनक्षेत्र असणारे हे वनविहार सोलापूर शहराचे फुफ्फुस आहे. हे वनविहारात वन्यप्राणी, पक्षी, किटक, सरीसृप आणि उभयचर यांच्या अनेक प्रजातींचा सुरक्षित अधिवास आहे. या वनविहारात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक आणि पर्यटक यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक सोयी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बालोद्याने, औषधी वनस्पती उद्यान, रोपवाटीका, मियावाकी पद्धतीचे जंगल, बांबू वन, करवंद वन, शिंदी वन, आम्र वन मातृवृक्ष वन, निरिक्षण मनोरे, तलाव, खुले जीम,वन्यप्राणी – पक्षी यांच्या प्रतिकृती आणि निसर्ग परिचय केंद्र यांचा समावेश आहे.

Scroll to Top