भीमा नदिच्या तीरावरील माचनूर गावातील हे हेमाडपंथी बांधणीचे अतिशय देखणे असे शीवमंदिर आहे. पूर्वीच्या काळी साधक या देवळामध्ये तपश्चर्येसाठी येत असत अशी आख्यायिका आहे. इथेच भीमानदीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देखणा असा दगडी घाट बांधलेला आहे. इथले नदिपात्रातले जटाशंकराचे देऊळ देखील प्रसिद्ध आहे.